आमच्याबद्दल

सुहासिनी योग ग्रुपमध्ये आपले स्वागत आहे

सुहासिनी योग ग्रुप हा योगाचे शिक्षण देऊन लोकांमध्ये योगाबाबत जागरूकता वाढवणारा महाराष्ट्रातील डोंबिवली येथील सर्व लोकांना आवडलेला व आपल्या योग शिकवण्याच्या पद्धतीने भारतात व भारताबाहेर सर्वांनाच परिचित असा झालेला योगा ग्रुप आहे.1999 साली सुहासिनी योग प्रायव्हेट इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. योग क्षेत्रात आपली आगळी वेगळी छबी उमटवून लोकांमध्ये हे इन्स्टिट्यूट प्रसिद्ध झाले आहे याचे कारण म्हणजे या ग्रुपचे समाजाला कळलेले उद्देश.

योगशिक्षण देशाच्या तळागाळात पोहचविण्यासाठी हा ग्रुप विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहे 2003 पासून स्वतंत्र योग वर्गांसोबत या ग्रुपने अंध-अपंग,रिमांडहोम ,वृद्धाश्रम ,कर्णबधिर ,मतिमंद.

पुनर्वसन केंद्र अशा शाळा व संस्थांमध्ये विनामूल्य योग प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, गव्हर्नमेंट संस्था ,कॉर्पोरेट मध्ये, योग शिक्षणाचे ज्ञानदान देण्यास सुरुवात केली. अगदी शहरांमध्ये सणासुदिंच्या दिवसात कधीकधी तर रस्त्यांवर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील टेलिव्हिजन शो व इतर जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये ह्या संस्थेने हिरिरीने भाग घेऊन योग प्रसाराच्या दृष्टीने प्रात्यक्षिकांचे व व्याख्यानाचे विविध कार्यक्रम केले . योग गुरु प्रवीण बांदकर यांच्या मार्गदर्शना अंतर्गत कार्य करीत असतात . फेसबुक यूट्यूब या सोशल मीडिया प्रसार माध्यमातून अनेक शारीरिक रोग, आजार व योग उपाय अशा विषयांवर हजारो

व्हिडिओची निर्मिती करून करोडो लोकांपर्यंत योग विद्येचा प्रसार या ग्रुपने केला आहे. लहान-लहान शालेय मुले योग अभ्यासाच्या दिशेने आकर्षित व्हावी म्हणून या ग्रुपचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रवीण बांदकर यांनी बर्फावरील योग रिदमिक योग दिपयोग असे विविध कार्यक्रम सर्वत्र दाखवून मुलांना योग अभ्यासाकडे वळवले आहे .

2006 पासून ते 2011 पर्यंत राज्य व राष्ट्रीय पातळीवर योग स्पर्धांमध्ये प्रवीण बांदकर यांच्या अनेक शिष्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. योग प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम पाहून सन्माननीय माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम आणि स्वामी रामदेव यांनी प्रवीण बांदकर यांचा विशेष गौरव केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओद्वारे अनेक कार्यक्रम राबवताना श्रुती शिंदे ,गायत्री शेटे, प्रसाद महामुनकर यांना निष्णात योगशिक्षक बनवून समाजाचे हित होईल अशा उपक्रमाची रचना गुरुवर्य प्रवीण बांदकर यांनी केली . संपूर्ण ग्रुपला सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या अध्यात्मिक ज्ञानाची जोड असून जीवनविद्या ते योगविद्या आणि.

योगविद्या ते जीवनविद्या असा अभिनव उपक्रम या ग्रुपचा सुरू आहे . योग म्हणजे शरीर आणि मनाचे ऐक्य मनाचे शास्त्र समजल्याखेरीज आणि मन हातात आले नाही तर शरीरावरही ताबा येणार नाही त्यामुळे हा ग्रुप लोकांची मन निर्मळ व आनंदी करण्यासाठी अध्यात्मशास्त्र विषयी मार्गदर्शन आपल्या अनेक व्हिडिओद्वारे करून लोकांमध्ये संत परंपरेविषयी व अध्यात्माची आवड निर्माण करून देत आहे. योग आचरण अष्टांग योग आणि जीवनविद्या भक्तियोग याचा सुरेख संगम म्हणजे सुहासिनी योग. लोकहितासाठी गेली कित्येक वर्षे अविरतपणे सुहासिनी योग ग्रुप समाज सुधारण्याचे कार्य करीत आहेत. त्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन विविध शाळांमध्ये विनामूल्य योग शिक्षण देताना आतापर्यंत दीड लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झाले असून सध्या नित्यनियमाने योग वर्ग शाळा-शाळांमध्ये सुरू आहेत . फेसबूक वर तीन लाखाहून (300k+)अधिक योगा फॉलॉवर असून जवळ जवळ सर्व योग प्रात्यक्षिकांचे व्हिडीओ देशभरात करोडो लोक पाहत असतात व त्यांना मार्गदर्शन होत असते अशा उपक्रमांमुळे लोकांचे अनेक शारीरिक व मानसिक आजार बरे होत असून लोक ठणठणीत होत असल्याची पावती लोकच आपापल्या अभिप्राया द्वारे देत आहेत असे अभिप्राय वाचून अनेक लोक आज योगासने

1.5 लाख
विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले
1 दशलक्ष
दर्शक
3
अभ्यासक्रम
23
वर्षांचा अनुभव

संघ सदस्य

सुहासिनी ऑनलाइन योग वर्ग
(सामान्य फिटनेस कार्यक्रम)

सामान्य फिटनेस कार्यक्रम लहान मुले आणि वृद्धांसह सर्व वयोगटातील लोकांसाठी योग्य आहे. हे ऑनलाइन योग वर्ग जगातील सर्व देशांतील लोकांसाठी खुले आहेत.

पुढे वाचा

Testimonials